एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास केसरकर पेठेतील साई सागर लॉज सातारा नजीक अरुण मनोज भोसले यांनी गांजा ओढू नका, असे म्हटल्याच्या कारणावरून श्रीसनी वंजारी अभिषेक पाटोळे व त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी भोसले यांना सिमेंटचा पेवर ब्लॉक काचेच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


