maharashtra

एमआयडीसी परिसरातून युवक बेपत्ता


एमआयडीसी परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : एमआयडीसी परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतील दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या जवळ असलेल्या वाचनालयाच्या येथून सुरेश नारायण निकम वय 26 राहणार कणसे ढाब्याच्या पाठीमागे, शिवराज पेट्रोल पंप, सातारा हा कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक भिसे करीत आहेत.