अनाधिकृत मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अनाधिकृत मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंह नगर ते खेड गावाकडे जाणाऱ्या नाल्याजवळ नवनाथ नामदेव पारधे वय 35, राहणार प्रतापसिंह नगर, सातारा याच्याकडे पांढऱ्या रंगाची इलेक्ट्रिक पोलला सपोर्ट म्हणून वापरली जाणारी चार हजार रुपये किमतीची तीस किलो लोखंडी तार मिळून आली. या मालाच्या मालकी हक्काबाबत पारधे यास काहीही माहिती देता न आल्याने त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक मोटे करीत आहेत.


