आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस संतोष शिवपालक वय 21 राहणार लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा याला एक वर्षासाठी सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपार केलेले असताना तसेच सातारा जिल्ह्यात येण्याबाबत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शिवपालक हा लक्ष्मी टेकडी, सदर बाजार येथे वावरत असताना सापडला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक भोसले अधिक तपास करीत आहेत.


