पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जिहे, तालुका सातारा येथील रेखा भानुदास सुतार वय 48 या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर आडव्या टाकलेल्या काठ्या काढत असताना तेथीलच दत्तात्रय दुर्योधन सुतार याने रेखा सुतार यांना शिवीगाळ करीत हातातील लोखंडी पारीने त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारून त्यांना जखमी केले. तसेच रेखा सुतार यांचे पती भांडणे सोडवण्यासाठी आले असताना त्यांच्याही डोक्यात लोखंडी पार घालून त्यांनाही जखमी केले. याचबरोबर शकुंतला दुर्योधन सुतार आणि पूनम दत्तात्रय सुतार यांनी शिवीगाळ दमदाटी करीत या तिघांना लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण केली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक पिसाळ करीत आहेत.