विडणी, तालुका फलटण येथे सुमारे 55 हजारांची चोरी केल्याप्रकरणी सहा जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विडणी, तालुका फलटण येथे सुमारे 55 हजारांची चोरी केल्याप्रकरणी सहा जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान दत्तात्रय सोपान कर्चे राहणार सोमंथळी, तालुका फलटण यांच्या मालकीच्या वीटभट्टी येथून सागर गोरख बर्डे, पूजा सागर बर्डे, भाऊसाहेब रंगनाथ पवार, अनिता भाऊसाहेब पवार, किरण बाळू बर्डे, मीना किरण बर्डे सर्व मूळ राहणार मनोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर हल्ली राहणार विडणी, तालुका फलटण यांनी पन्नास हजार रुपये रोख आणि सहा हजार सहाशे रुपये किमतीचे इतर साहित्य अशी 56 हजार 600 रुपयांची चोरी केली आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक फौजदार कदम अधिक तपास करीत आहेत.


