अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यात असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलगी शेतात उसाचे पाचट काढत असताना त्याच गावातील विठ्ठल शशिकांत अंबिके यांनी तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आहे. याबाबतची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली असून महिला पोलीस उपनिरीक्षक सोमदे अधिक तपास करीत आहेत.