येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोर असलेल्या डिव्हायडरमध्ये एकजण मृतअवस्थेत आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील शिवराज पेट्रोल पंप परिसरातून तेरा वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा तालुक्यातील एका गावातून युवती घरातून निघून गेली असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून जबरी चोरी करून त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या खून प्रकरणातील संशयितास जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि तळबीड पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हा पोलिसांनी केवळ दोन तासात उघड केला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा १३ वा वर्धापनदिन दि ५ जानेवारी २०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून नविन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोठ्या उत्साहात जनजागृतीचे कार्यक्रम तसेच शाळा-महाविद्यालयात विविध स्पर्धांचेआयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
सातारा शहरातील बंदिस्त स्वरूपाची कॅफे हे तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
विषयांच्या अपूर्ण टिपण्या आणि भरमसाठ विषयांची जंत्री करत सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेने तब्बल 181 विषयांना शुक्रवारी मंजूरी दिली.
शाहूनगर शाहूपुरी व शहराच्या हद्दवाढीतील नवीन भागात असणाऱ्या वकिलांच्या कार्यालयांना वाणिज्य कर लावू नये, अशी मागणी शाहूनगर येथील एडवोकेट सचिन तिरोडकर यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.