लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून सतीश इंजु शेळके राहणार धारेश्वर, तालुका पाटण याने तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शेळके यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत.


