maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान विशाल ज्ञानेश्वर सोनवणे वय 26 राहणार धोम पुनर्वसन, तालुका वाई यांना तुमचा स्ट्रॉबेरी विक्रीचा स्टॉल आमच्या स्टॉल शेजारी लावू नका असे म्हटल्याच्या कारणावरून सुरेश विष्णू गोरे आणि आदित्य अतुल बिरलिंगे दोघेही राहणार अनवडी, तालुका वाई यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तसेच त्यांचे पायो कुत्रे बोलावून सोनवणे यांना त्या कुत्र्याने चार ठिकाणी जावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार मुंगसे करीत आहेत.