maharashtra

तेरा वर्षीय मुलीचे अपहरण


येथील शिवराज पेट्रोल पंप परिसरातून तेरा वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील शिवराज पेट्रोल पंप परिसरातून तेरा वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.४ जानेवारी रोजी ८ ते १ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील शिवराज पेट्रोल पंप परिसरात असणाऱ्या खंडोबाचा माळ येथील श्री दत्त समर्थ अपार्टमेंट येथून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.