सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा १३ वा वर्धापनदिन दि ५ जानेवारी २०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून नविन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोठ्या उत्साहात जनजागृतीचे कार्यक्रम तसेच शाळा-महाविद्यालयात विविध स्पर्धांचेआयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा १३ वा वर्धापनदिन दि ५ जानेवारी २०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून नविन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोठ्या उत्साहात जनजागृतीचे कार्यक्रम तसेच शाळा-महाविद्यालयात विविध स्पर्धांचेआयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक मनिकं दा. रामानुजम यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमापूर्वी कोयनानगर येथिल नेताजी सुभाष हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानव वन्यजीव संघर्षया विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली परीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबणीस यांनी सर्व मान्यवरांचेस्वागत केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत यांनी प्रास्ताविक सादर केले.
वर्धापनदिन कार्यक्रमाचे औचित्य साधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पूर्वी काम के लेल्या निवृत्त वन अधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच व्याघ्र प्रकल्पात विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून २०२३ या वर्षाकरिता प्रकाशित केलेल्या फुलपाखरांच्या थिमवरील दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.उपसंचालक उत्तम सावंत यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या आजवरच्या वाटचालीविषयी तसेच भविष्यातील नियोजित कामांबाबत सादरीकरण केले. उपस्थित सहभागिधारकांचे चर्चा सत्राद्वारे मोलाचे विचार व मार्गदर्शन घेण्यात आले. ढेबेवाडी वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच रत्नागिरी जिल्ह्यांचेमानद वन्यजीव रक्षक, वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन ट्रस्ट, स्पंदन व प्लॅनेट अर्थ फाऊंडेशन सारख्या अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, पंचक्रोशीतील पत्रकार, ग्रामपरीस्थितीकीय विकास समित्यांचे अध्यक्ष, बामणोली परीसरातील बोट क्लबचेअध्यक्ष तसेच होमस्टे, हॅाटेल्स व रिसॅार्ट्स चेमालक आदी व्याघ्र प्रकल्पाचे सहभागिधार उपस्थित होते.


