अत्यंत अटीतटीने लढलेल्या पानवन ग्रामपंचायतीमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पुन्हा एकदा गजर दुमदुमला. अकरापैकी सात उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री नानासो शिंदे यांची सरपंचपदी तर चांगुना रायचंद शिंदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सरपंचपद सर्वसाधारण खुले असताना सरपंच व उपसरपंच पदी महिलांना संधी देऊन पानवन राष्ट्रवादीने नवा आदर्श घालून दिला आहे.
माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या सरपंचपदी राणी भाऊ माने तर उपसरपंचपदी अर्चना आबा कोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
टाकेवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरंपचपदाच्या निवडीवर अनपेक्षितपणे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दादासो काळे यांनी बाजी मारली. त्यांचे खंदे समर्थक नीलेश अंकुश दडस यांची सरपंचपदी तर सीमा शिवाजी ताटे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली असून, ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा रोवण्याचे काम दादासो काळेंनी करून दाखवले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला. आज मुदत संपताच पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय प्रांताधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
‘सुमारे दीडशे वर्षापूर्वी पासून कब्जे वहिवाटीत व स्वत: कसत असलेल्या कूळ शेतकर्यांची मालक सदरी नावे व आणेवारी नोंद केलेला सातबारा त्यांच्या हाती दिला जात नाही, तोपर्यंत शेतकरी प्रांत कार्यालया समोरील ठिय्या आंदोलन थांबविणार नाहीत,’ असा इशारा डॉ. भारत पाटणकर निवेदनाद्वारे दिला आहे.
वरकुटे येथे युवाराजे युवक मंडळाच्या वतीने शिवजयंती कोरोनाच्या सावटाखाली मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
ज्ञानगंगा एजुकेशन सोसायटी संचलित माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल सायन्स अँड रिसर्च् सेंटर म्हसवड येथील प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसी विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये संस्था व महाविद्यालयाची माहिती देण्यात आली.
‘माझा गड माझा अभिमान’ या ग्रुपच्या वतीने किल्ले वारूगड (ता. माण) येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवत शैक्षणिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
माण तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील मुख्य शहर असणार्या दहिवडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली आकर्षक मूर्ती, अतिभव्य व्यासपीठ, डोळे दिपवणारी होते. फटाक्यांची आतषबाजी व शिवभक्तांचा अलोट उत्साह अशा जबरदस्त वातावरणात दहिवडी व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.