sports

म्हसवडच्या माणदेश फार्मसी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रम संपन्न


ज्ञानगंगा एजुकेशन सोसायटी संचलित माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल सायन्स अँड रिसर्च् सेंटर म्हसवड येथील प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसी विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये संस्था व महाविद्यालयाची माहिती देण्यात आली.

वरकुटे : ज्ञानगंगा एजुकेशन सोसायटी संचलित माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल सायन्स अँड रिसर्च् सेंटर म्हसवड येथील प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसी विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये संस्था व महाविद्यालयाची माहिती देण्यात आली.

यावेळी प्राचार्य डॉ. बी. व्ही. उदुगडे यांनी भविष्यात औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील नोकरी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांमध्ये विद्यार्थी काम करू शकतात, याबद्दल मार्गदर्शन केले तसेच त्यांनी महाविद्यालयाची शिस्त, संस्थेची विद्यार्थी विषय भूमिका स्पष्ट केली. 

या कार्यकामासाठी संस्थेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण लेंगरे, संस्थापक सचिव दादा कोडलकर यांनी संस्थेची माहिती दिली. बी. फार्मसी आणि डी. फार्मसी 1 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी Induction programe या दिवसाची सुरुवात सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत टिळक सोहळ्याने प्राध्यापक आणि मिठाईच्या तुकड्याने केले गेले. व तसेच विद्या-शाखा सदस्य, कॉलेज चेअरमन, व्हा. चेअरमन, फॉउंडर सेक्रेटरी तसेच कॉलेजचे प्राचार्य, उप-प्राचार्य, पालक आणि इतर स्टाफ मेंबर्स या सर्वांच्या उपस्थितीने शुभ-दिव्यांचे वितरण करून व सरस्वती फोटोचे पूजन करून या सोहळ्याची सुरुवात केली.

या कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. उदुगदे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट, माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, म्हसवड यामध्ये MSBT Approval, DBATU Approval, PCI Approval या व्यवस्थापन, त्यांचे व्हिजन, मिशन आणि बरेचसे मूलभूत मूल्ये दिली व तसेच दररोज 100 टक्के उपस्थिती, युनिफॉर्म वेअरिंग, विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान न करणे, सर्व प्रकारच्या शिस्त पाळणे आणि रॅगिंग चा घटनांवर पुन्हा नोंदविण्यावर भर दिला.

प्रत्येक प्राध्यापक सदस्याने त्यांच्या विशिष्ट तेच्या क्षेत्रासह स्वतःची ओळख करून दिली व नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा परिचय करून घेतला. व तसेच नंतर कॉलेजचे सेक्रेटरी यांनी ही खूप अनमोल शब्दामध्ये त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच कॉलेजचे व्हा. चेअरमन यांनी ही विद्यार्थ्यांना कोरोना ची काळजी घेत असून त्यांनी ही मार्गदर्शन केले. 

तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट या विषयावर कॉलेजचे मोरे आणि सोनवलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कॉलेजचे डिप्लोमा आणि डिग्री कल्चरल इन्चार्ज एम आर. शेटे आणि वाघमोडे यांनी ही मार्गदर्शन केले. 

या कार्यकामासाठी विद्यार्थी, पालक, उपप्राचार्य बी. एन. बनगर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.