Maan

esahas.com

माणपूर्व भागातील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना निवेदन

दुष्काळाच्या विश्रांतीनंतर मागील वर्षी अवकाळीने फटकारलेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विमा, नियमितपणे कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर भत्ता लवकरात लवकर न दिल्यास सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा निर्धार वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत माणच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

esahas.com

पळशीच्या शेतकर्‍याचा मुलगा दोन वेळा फौजदार

अधिकार्‍यांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पुट्ट्यातील माणमधील पळशी गावचे सुपुत्र नितीन दादासो हांगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये सलग दोन वेळा जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त करून पळशी गावासह शेतकरी असलेल्या आई-वडिलांचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. एकंदरीत एमपीएससी परीक्षेत नितीन हांगे यांची डबल हॅट्ट्रिक केली आहे.

esahas.com

आजपासून सलग तीन दिवस दहिवडी शहर बंद

दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दि. 20, 21 व 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.

esahas.com

वडगावमध्ये प्राथमिक शिक्षकाने बनवल्या घरोघरी शाळा

विद्यार्थ्यांच्या घरात, अंगणात तसेच घराशेजारील परिसरात विविध प्रकारे केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे घर हेच शाळा झाल्याची परिस्थिती वडगाव (ता. माण) येथे झाली आहे. जिल्हा परिषद शाळा वडगावचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फलित आहे. माण पंचायत समिती सभापती कविता जगदाळे यांनी उपक्रमाची पाहणी करून उपक्रमाचे कौतुक केले.

esahas.com

वडजल येथे क्रांतिगुरू वस्ताद लहुजी यांची जयंती उत्साहात साजरी

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांना घडवणार्‍या, तसेच लोकमान्य टिळक, म. जोतिबा फुले, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदींनाही तालीम देणार्‍या क्रांतिगुरू वस्ताद लहुजी यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ वडजल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

esahas.com

युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत करिअर घडवावे 

‘स्पर्धेच्या युगात युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत आपले करिअर घडवावे,’ असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.

esahas.com

वडगावच्या माळरानावर युवा शेतकर्‍याने फुलवली आंब्याची बाग

आधुनिक काळात शिक्षणासोबतच शेतीचे महत्त्व सर्वांना समजले आहे. याचीच दखल आजचा तरुण घेत असल्याचे एक जिवंत उदाहरण माण तालुक्यातील वडगावच्या रानावर पाहायला मिळत आहे. सुमारे दहा एकर निव्वळ माळरानावर डोंगर हिरवागार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बालाजी जगदाळे यांनी केला आहे. त्यांनी  या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून 2700 झाडे लावली आहेत आणि ती पूर्णपणे जगवलेली सशक्तपणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.

esahas.com

दहिवडी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दहिवडी कॉलेज व अक्षय रक्तपेढी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

esahas.com

‘जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत

‘जल जीवन मिशन अंतर्गत माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कुटुंबांना तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे,’ असे आवाहन जिल्हा परिषद साताराचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले.

esahas.com

बनगरवाडीच्या ‘रॉयल क्लब’नं थाटलं सुसज्ज ग्रंथालय

बनगरवाडी, ता. माण येथील रॉयल क्लबच्या तरुणांनी क्रिकेट स्पर्धेसाठी जमवलेल्या पैशातून ग्रामपंचायत कार्यालयातच सुसज्ज ग्रंथालय थाटल्याने, वाडी-वस्त्यांवर राहून हलाखीत महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या तरुणांना मोफत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या विधायक कार्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांंच्या अभ्यासासाठी उपयोगी पुस्तके, माहिती आणि ग्रंथ साहित्याचा यामध्ये समावेश करून, रात्रंदिवस खुल्या राहणार्‍या ग्रंथालयामुळे शाळकरी तरु