आधुनिक काळात काही जुन्या गोष्टी लुप्त पावत चालल्या आहेत. मात्र, मायेची ऊब देणारी गोधडीची ऊब काही कमी झाली नाही. माणदेशी गोधडीला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे दहिवडी येथील चंद्रिका नवगण किशोर यांनी. चंद्रिका यांच्या अनेक उत्पादनाला जगभरातून मागणी होत आहे.
‘एकीकडे कोरोना संकटाशी मुकाबला सुरू असतानाच दुसरीकडे विकासकामे पूर्ण करून जनसुविधांत भर घालण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबरोबरच पायाभूत सुविधा आणि इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचा परिसर असलेल्या वरकुटे-मलवडीच्या विकासाला नवी दिशा देणार आहे,’ असे प्रतिपादन कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुवर्णाताई देसाई यांनी केले.
माण तालुक्यातील नरवणेसह दोरगेवाडी, काळेवाडी तसेच गटेवाडी परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, कांदा व मका आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
माण तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली असून, तालुक्याच्या पूर्व भागात या पावसामुळे नदी व ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच या पावसाने नदीकाठच्या परिसरामध्ये बाजरी व ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
माण तालुक्यातील येळेवाडी गावातील दडसवस्ती येथे असणार्या ओढ्यावर लोंबकळलेल्या वीज तारा नागरिकांसाठी व जनावरांसाठी धोकादायक असतानासुद्धा तेथून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिक महावितरणच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.
‘मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊन शेतकर्यांनी वेळीच उपाययोजना केली तर या अळीचा प्रादुर्भाव रोखणे व मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होते,’ असे मत कृषी सहायक राहुल कांबळे यांनी व्यक्त केले.
‘वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची गरज वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी शेतकरी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. मातीतील मूलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने मातीचा कस कमी होत चालला आहे. मातीत मीठ फुटण्याचे प्रकार घडतात, मातीची उगवण क्षमता, मातीचा कस, उत्पादन क्षमता कमी होतेय त्यामुळे माती परीक्षण ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय सत्रे याने केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्ताने शिक्षकांप्रति सन्मान प्रकट करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील शंभू महादेव देवस्थानच्या ठिकाणी प्रसिद्ध असे गुप्तलिंग आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात. तसेच सुमारे तीन किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले धार्मिक ठिकाण असल्याने गुप्तलिंग या ठिकाणाला शिवकालिन व ऐतिहासिक वारसा असल्याने ते आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. गुप्तलिंगच्या आजूबाजूच्या डोंगरभागातून छोटे-छोटे धबधबे पावसाळ्यात वाहतात. त्यामुळे हा परिसर मनमोहित करणारा आहे. याचा मनमुराद आनंद शिवभक्त पर्यटक घेत असतात. मात्र, सध्या गुप्तलिंग मंदिराकडे जाणार्या पायरी
‘सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारा शिक्षक हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे. ज्ञान मंदिरातील काळ्या फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात रंगभरणी करण्याचे काम शिक्षक करीत असतो. एक शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती हा खडतर प्रवास आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे मत विश्वंबर बाबर यांनी व्यक्त केले.