भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्ताने शिक्षकांप्रति सन्मान प्रकट करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
म्हसवड : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्ताने शिक्षकांप्रति सन्मान प्रकट करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
म्हसवड शाखा नेहमीचा वेगवेगळे आदर्शवत उपक्रम राबवत असल्यामुळे म्हसवड शाखा नेहमीच सर्व खातेदारांना आपलीच बँक वाटतं असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
म्हसवड शाखेने नुकताच ‘जिल्हा आदर्श शिक्षिका’ पुरस्कार मिळालेल्या सुजाता कुंभार, सतीश कुंभार, अशोक जमाले, जावेद मुल्ला, आकाराम शिंदे, यशश्री शिंदे, सुजाता गवरे आदी शिक्षक बांधवांना निमंत्रित करून म्हसवड शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी म्हसवड शाखेच्या प्रमुख सविता कारंडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन योजनांची माहिती देत वैयक्तिक, मध्यम मुदत कर्ज 25 लाख, ओडीवरील कमी झालेले व्याजदर आदींसह बँकेच्या सर्व योजनांची माहिती देत त्याचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
या वेळी कॅशियर विलास तोडकर, चंद्रकांत शेंडगे, विकास अधिकारी महादेव गोरे, लहुराज पोळ, ललिता वळवी, युवराज सरतापे, धनाजी जगदाळे, आनंदा झिमल आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे विकास अधिकारी लहुराज पोळ यांनी प्रास्ताविक केले. विकास अधिकारी महादेव गोरे यांनी आभार मानले.
विनम्र सेवेसाठी म्हसवड शाखेची परिसरात ओळख
म्हसवड शाखेत सर्वच ग्राहकांना विनम्रपणे सेवा दिली जात असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या अडचणी तत्परतेने सोडवण्यासाठी बँकेचे सर्व कर्मचारी प्रयत्न करीत असतात.