सांगली जिल्ह्यातील वजनदार नेत्यांनी कायम दुष्काळात होरपळणार्या माणच्या पूर्वेकडील जनतेला डावलून टेंभू योजनेतील पाण्याचा एक थेंबही न देता, सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून पाणी पुन्हा सांगली जिल्ह्यातील दिघंचीकडे वळवले आहे.वरकुटे-मलवडी, शेनवडी गावच्या सीमेवरून टेंभू योजनेचे पाणी जात असताना स्वातंत्र्य पूर्व काळापासून तहानलेली जनता कसलीही तमा न बाळगता, जनआंदोलन उभारून पाणी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचे मत पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते धीरज जगताप यांनी शेनवडी येथे व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीराम उद्योग महाविद्यालय, पाणीव (ता. माळशिरस) यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे कृषिकन्या प्रणिता कृष्णा जाधव हिने शेतकर्यांच्या जनावरांसाठी मोफत लसीकरण व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस माणगंगा सहकारी पतसंस्थेच्यावतीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजारांचा धनादेश दहिवडी येथे तहसीलदार बाई माने यांच्याकडे माणगंगा संस्थेचे अध्यक्ष सीताराम कदम व वडूज शाखा व्यवस्थापक विजय जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
शासकीय कृषी महाविद्यालय, कराड अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2020 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कराडच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदूत अभिजित लालासाहेब राऊत व सुजय शंकर घनवट यांनी माण तालुक्यात डंगिरेवाडी (मोही) या गावामध्ये शेतकर्यांना विविध पिकासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी त्यांनी विविध इंटरनेट अॅपच्या माध्यमातून पिकावरील रोग किडी कशा ओळखाव्यात याची माहिती दिली.
माण तालुक्यातील राणंद गावातील शिवाजीनगरमध्ये घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून दोन घरे जळून खाक झाली आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, घरात गॅस सिलिंडर असल्याने त्या ठिकाणी वातावरण भयभीत झाले होते.
म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, रोज वाढणार्या कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे होत असलेले हाल पाहून शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 28) एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार केलेल्या घोषणाबाजीची तत्काळ दखल घेत माणच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी म्हसवड येथे येऊन शहरातील धन्वंतरी रुग्णालय हे ताब्यात घेत आजपासून हे रु
माण-खटाव तालुक्यांतील चारा छावण्यांची बिले देताना प्रशासनाने आर्थिक तडजोड करून बिले काढली आहेत. तसेच या कार्यालयांतील विविध कामे दलालांमार्फत केली जात असून, त्याबाबतची तक्रार जिल्हास्तरावर करूनही न्याय मिळत नसल्याने या प्रकरणांची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली आहे.
तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरमध्ये महिलांनी गौराईचा आगमन पूजन सोहळा उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शिंगणापूरमधील काही महिलांनी गौराई सणात समाज प्रबोधन, धार्मिक स्थळे, विवाह सोहळा, पर्यावरण समतोल, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषणमुक्त परिसर संकल्पना, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व पारंपरिक जुन्या रूढी-परंपरा, तसेच कोरोना बचाव देखावा असे सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते.
कमी कालावधीत रोख पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी मूग पिकाची कोरडवाहू पट्ट्यात आंतरपीक म्हणूनही लागवड करतात. मात्र, यंदाच्या हंगामात लागवड झालेल्या मुगाचे संपूर्ण पीक कीड आणि रोगांमुळे शेतकर्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चसुद्धा निघण्याची शक्यता नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, दि. 23 रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी 5 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.