माण तालुका सेवानिवृत्त संघटनेमार्फत कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून दोन लाखांचा धनादेश माणच्या तहसीलदार बाई माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नसून शनिवारी पुन्हा शहरात 13 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून यामध्ये 8 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला असून, त्या परिसरात म्हसवड पालिकेच्यावतीने निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे.
‘माण तालुक्यात जरी दुष्काळ असला तरी या भागातील शेतकर्यांची कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे शेती क्षेत्रातील प्रगती ही उल्लेखनीय आहे. शेतकर्यांनी सेंद्रिय शेती करत मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसायाकडे वळले पाहिजे,’ असे मत बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या समन्वयक सुनंदाताई पवार यांनी माण तालुक्याच्या एक दिवसीय दौर्याप्रसंगी असताना व्यक्त केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्या शंभू महादेवाचे देवस्थान असलेल्या शिंगणापूरमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस कायमच धावत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारीने सर्वत्रच थैमान घातल्याने एसटीची सेवा सुमारे 5 महिन्यांपासून बंद होती.
माण तालुक्यातील पळशी गाव हे शेतीच्या बाबतीत सधन समजले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या पावसाच्या जोरावर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची लागवड केली आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील पुष्कर तलाव सुमारे 70 टक्के भरला आहे. तलावात साठलेल्या पाण्यामुळे शिंगणापूर गावासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच दुष्काळवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने 2014 पासून ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पोचपावती मिळाल्याचेही गावकरी सांगत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून म्हसवड परिसरातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असतानाच काल पुन्हा तिघे कोरोनाबाधित झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याने व वरकुटे-मलवडीची साखळी म्हसवडमध्ये पाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे. तर म्हसवड येथील आरोग्य विभागातील कर्मचारीच बाधित झाल्याने म्हसवड पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने हादरून गेले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माण तालुक्यातील पळशी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत असून, आज त्यांच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
दुष्काळी माणमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे जवळपास सर्व तलावात कमी-अधिक प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे.तर जून व जुलै महिन्यांमध्येही चांगला पाऊस झाल्याने माणमधील खरीप हंगाम बहरला आहे.