sports

म्हसवडमध्ये आणखी तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह 


गेल्या काही दिवसांपासून म्हसवड परिसरातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असतानाच काल पुन्हा तिघे कोरोनाबाधित झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याने व वरकुटे-मलवडीची साखळी म्हसवडमध्ये पाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे. तर म्हसवड येथील आरोग्य विभागातील कर्मचारीच बाधित झाल्याने म्हसवड पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने हादरून गेले आहे.

म्हसवड : गेल्या काही दिवसांपासून म्हसवड परिसरातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असतानाच काल पुन्हा तिघे कोरोनाबाधित झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याने व वरकुटे-मलवडीची साखळी म्हसवडमध्ये पाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे. तर म्हसवड येथील आरोग्य विभागातील कर्मचारीच बाधित झाल्याने म्हसवड पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने हादरून गेले आहे.
सोमवारी म्हसवडमधील रहिवासी असलेली एक महिला व दोन पुरुष असे तिघे बाधित झाल्याने माण तालुक्यात बाधितांची संख्या 127 झाली आहे तर म्हसवड शहराची संख्या 21 वर पोहोचली आहे.
काल रात्री उशिरा शिक्षक कॉलनी येथील आरोग्य केंद्रात काम करत असलेल्या 57 वर्षीय पुरुष, पोलीस स्टेशन रोडवरील चांदणी चौकानजीक असलेल्या 42 वर्षीय युवक, वरकुटे-मलवडी येथील बाधित कुटुंबाच्या एका सदस्याचे म्हसवड येथे सातारा-पंढरपूर रोडवर असलेल्या एक दुकानदार तो 42 वर्षीय युवक वरकुटे-मलवडी येथील बाधित कुटुंबाच्या संपर्कात आल्याने वरकुटे-मलवडीच्या बाधितांची साखळी निर्माण झाली. आता म्हसवडमध्ये घट होणार की साखळी तुटणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
तर तिसरी बाधित 45 वर्षीय महिला ही देवांगनगर येथील असून रक्षाबंधनानिमित्त ती आपल्या भावाकडे एक दिवस पंढरपूर येथे गेली होती, त्यामुळे बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे.   
या वाढत्या बाधितांमुळे म्हसवड येथील ग्रामस्थ धास्तावले असून, पालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने, चैतन्य देशमाने, सागर सरतापे, वैद्यकीय अधिकारी डॉ. काकडे, खाडे यांनी बाधित राहत असलेल्या भागाची पाहणी केली असून, येथील परिसर हा निर्जंतुक करण्यात आहे तर येथे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्या बाधितांच्या कुटुंबातील 16 जणांचे स्वॅब तपासणीस पाठवले आहेत.