sports

वरकुटे येथे कोरोनाच्या सावटाखाली शिवजयंती साजरी 


वरकुटे येथे युवाराजे युवक मंडळाच्या वतीने शिवजयंती कोरोनाच्या सावटाखाली मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. 

वरकुटे : वरकुटे येथे युवाराजे युवक मंडळाच्या वतीने शिवजयंती कोरोनाच्या सावटाखाली मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. 

कोरोनाच्या सावटामुळे अनेक निर्बंध शिवजयंती उत्सवावर टाकण्यात आले असल्याने यावर्षी शिवज्योत आणण्यात आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात कार्तिकी माने, यशराज शिंदे, वैष्णवी सावंत, काजल माने, विनायक माने, अक्षर माने या शालेय मुलांनी छ. शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर भाषणे केली. त्यांना माजी सैनिक पांडुरंग केरू माने व सुनील बबन माने यांनी रोख स्वरूपत बक्षिसे दिली. 

या कार्यक्रमासाठी प्रा. सचिन होनमाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी अजित काटकर, काकासाहेब माने, ब्रह्मदेव पाटील, मारुती मोटे, नारायण जाधव, विजय शिंदे, विजय काटकर, प्रकाश बनसोडे, अल्लाबक्ष सय्यद, शिवाजी माने, अविनाश काटकर, अनिल माने, दादासाहेब बनसोडे, अंकुश माने, धनाजी माने, अमोल पारसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

युवाराजे मंडळाच्या सर्व सदस्यांनी शिवजयंती कार्यक्रम साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.