सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन मिळवून देण्यासाठी बी.सि. ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, उत्तर पार्ले ता. कराड येथील गृहपाल वर्ग 3 महिला अधिकारी यांनी तक्रारदार महिलेकडे 20 हजारांची लाच मगितली. त्यानंतर गुरुवार सापळा रचून 15 हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने संबंधित महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. गुरुवारी 17 रोजी ही कारवाई करण्यात आली.
स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे येथील भेदा चौकात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकस्थळास शंभूतीर्थ असे संबोधण्यात येणार असून देशातील एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्मारकासाठी शासकीय परवानग्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत.
वाठार, ता. कराड येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर टेंपोचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
घारेवाडी, ता. कराड येथे साई पेट्रोल पंपाजवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर घारेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत साई पेट्रोल पंपाजवळ सोमवारी 14 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उत्तम आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी व इंधन बचतीसाठी सायकलच उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन दिपक बेलवलकर यांनी केले.
समाजाचे मन वाचण्याचे आणि समाज मन चेतवण्याचे शाब्दिक सामर्थ्य आणि वैचारिक ऐश्वर्य त्यांच्या ठायी होते. यशवंतराव हे नितीमुल्ये जपणारे मानवतेचे मंदिर असून नव्या पिढीने जाणतेपणाने त्यांच्या जीवनचरित्रातून सत्कर्माची प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डाँ. यशवंत पाटणे यांनी केले.
कराड शहर पोलिस ठाण्याच्या माध्यमातुन शुक्रवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑल आऊट मोहिमेत एकुण 15 जणांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.
कराड तालुक्यात पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर पाचवड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सातारा येथील दोन युवक जागीच ठार झाले. गुरुवारी 10 रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
वराडे, ता. कराड गावानजीक पुणे-बेंगलोर आशिया महामार्गावर विनापरवाना खैर प्रजातीची वृक्षतोड करून त्यापासून माल तयार केलेल्या मालाची वाहतुक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी वनविभागाकडून ही कारवाई मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये ट्रकसह ट्रक चालकास वनविभागाने ताब्यात घेतले. तसेच वनविभागाने साडे चार लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. दोन दिवसीय शिक्षण महोत्सवाची शुक्रवारी ११ रोजी सांगता झाली. महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.