maharashtra

वाठार येथे टायर फुटल्याने टेंपो महामार्गावर पलटी

मालासह वाहनाचे नुकसान : जिवीतहानी नाही

Tempo overturned on the highway due to a flat tire at Wathar
वाठार, ता. कराड येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर टेंपोचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

कराड : वाठार, ता. कराड येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर टेंपोचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळावरून व पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, टेंपो क्रमांक (एम.एच ०९- एफ.एल ०८९ ) चा चालक माल घेऊन कराडच्या दिशेने येत होता. वाठार येथे पुणे-बंगळूर महामार्गावरील उड्डाणपूलावर वाठार मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास टेंपोचा अचानक टायर फुटला. भरधाव वेगात अचानक टार फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात वाहनासह मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त टेंपो बाजूला करून वाहतूकीस सुरळीत केली.