Karad

esahas.com

कराडचा नवीन कृष्णा पूल वाहतुकीस खुला...!!

कराड ते विटा महामार्गावरील येथील कृष्णा नदीवर झालेला नवीन कृष्णा पूल दुपारपासून वाहतुकीला खुला करण्यात आला. पुलाचे काम तब्बल तीन वर्षे सुरू असल्याने पूल बहुचर्चित होता. त्यासाठी तब्बल ३५ कोटींचा खर्च आला आहे. पूल तब्बल ३२० मीटरचा आहे. पुलाखाली ४० मीटरचे आठ गाळे आहेत.

esahas.com

कराडात थकबाकी वसुलीवेळी वायरमनला मारहाण; एकावर गुन्हा 

सुमंगलनगर, कार्वे नाका, कराड येथे वीज बिलांची थकीत वसुली करण्यासाठी गेलेल्या वायरमनला मारहाण करण्यात आली. गुरुवारी 24 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

जखिणवाडी, ता. कराड येथे एकावर कोयत्याने वार झाला आहे. बुधवारी 23 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गावच्या यात्रेदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून रात्री उशिरा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

esahas.com

युवक- युवतींच्या "रंग बरसे"चा बेरंग

मलकापूर हद्दीत महामार्गावर असलेल्या महामर्गावरील ग्रीनलॅन्ड हाॅटेलमध्ये युवक- युवतींना एकत्र करून रंगपंचमीनिमित्त आयोजित केलेला रंग बरसे कार्यक्रम पोलिसांनी उधळला. कोणतीही परवानगी न घेता ग्रीनलॅन्ड या हॉटेलमध्ये कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमापूर्वीच जमलेल्या युवक, युवतींना पोलिसांनी हकलले, मात्र आयोजक किंवा हाॅटेलवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

esahas.com

शकिला शेख ठरली कराड तालुक्यातील पहिली महिला सैनिक

खरं तर असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. विशेषतः सैन्यदलात महिला सहभागी होण्याचे प्रमाण अल्प आहे. कोळे, ता. कराड येथील भूमीकन्या शकिला आमीर शेख हिने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स दलात रूज होत सैन्य दलातील कराड तालुक्याची पहिली कन्या होण्याचा मान मिळवला आहे.

esahas.com

कराड लोकन्यायालयात तब्बल साडेपाच कोटीच्या तडजोडी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कराड जिल्हा सत्र न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यायालयात विविध प्रकारचे तब्बल २ हजार १६१ न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यामध्ये सुमारे ५ कोटी ५१ लाख २ हजार ४४५ रुपयांचे न्यायालयीन वाद तडजोडीने मिटवण्यात यश आले.

esahas.com

कालेत एकास मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

काले, ता. कराड येथे माझ्या शेतात टाकलेले घेवड्याचे वेल काढ, असे म्हटल्याच्या कारणावरुन पिता-पुत्राने एकाला मारहाण केली. गुरूवारी १७ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

कालेत एकास मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

काले, ता. कराड येथे माझ्या शेतात टाकलेले घेवड्याचे वेल काढ, असे म्हटल्याच्या कारणावरुन पिता-पुत्राने एकाला मारहाण केली. गुरूवारी १७ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

सातारा केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी जागेचा शोध सुरू

सातारा केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केलेल्या मागणीला व त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी जागेचा शोध सुरू असून पर्यायी जागांची पहाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी शासकीय अधिकाऱ्यांसोबत केली.

esahas.com

कृष्णा फौंडेशनमध्ये एमबीएच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरु

आज एमबीए या व्यवस्थापन क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्यवस्थापन क्षेत्रात आपले करिअर करताना दिसत आहेत. नवीन शैक्षणिक २०२२ साठी ७ एप्रिल ही व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या  शासकीय प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे. या कालावधीत जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृष्णा फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.