हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड येथील दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तासवडे टोल नाका, ता. कराड परिसरात जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करण्यासाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला (वय 42) यांचे आज कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
इंद्रधनु विचारमंच फौंडेशनने टेंभू येथे आगरकरांच्या नावे पुरस्काराचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या प्रेरणादायी उपक्रमामुळे गुणवंत पत्रकारांबरोबरच टेंभू हे प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ म्हणून गौरवले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केला.
शहरातील कृष्णा नाका परिसरात देशी बनावटीच्या पिस्तुलसह एक आणि तडीपार असलेल्या दोन आरोपींसह तिघांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
आशियाई महामार्गावर वराडे ता. कराड गावचे हद्दीत कांबळे वस्ती नजिक दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तासवडे एमआयडीसीत कामासाठी जाणारे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मनोहर भास्कर यादव व नगरसेवक राजेंद्र प्रल्हाद यादव तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र तेली व संजीवनी शंकराव दळवी यांनी शासनाची फसवणूक करून नगरपंचायतीकडे जमा झालेल्या कामगार कल्याण निधीचा अपहार केल्याप्रकरणाचा तपास करून अंतिम अहवाल दोन महिन्याच्या आत सादर करावा, असे आदेश कराड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस एम सरोदे यांनी नुकतेच कराड पोलिसांना दिले आहेत.
चरेगाव, ता.कराड हद्दीदरम्यान असलेल्या सुकाई देवी मंदिरा जवळील परिसरात अवैधरित्या करण्यात आलेल्या मुरूम उत्खननाशी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.