maharashtra

वराडे येथे दुचाकीला कारची धडक, दोघेजण गंभीर


Two-wheeler hit by car at Varade, two serious
आशियाई महामार्गावर वराडे ता. कराड गावचे हद्दीत कांबळे वस्ती नजिक दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तासवडे एमआयडीसीत कामासाठी जाणारे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

उंब्रज : आशियाई महामार्गावर वराडे ता. कराड गावचे हद्दीत कांबळे वस्ती नजिक दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तासवडे एमआयडीसीत कामासाठी जाणारे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये महिला व पुरुष यांचा समावेश आहे. शुक्रवारी ८ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी कराड येथे दाखल केले आहे. जखमींची नावे समजू शकली नाहीत.