चरेगाव, ता.कराड हद्दीदरम्यान असलेल्या सुकाई देवी मंदिरा जवळील परिसरात अवैधरित्या करण्यात आलेल्या मुरूम उत्खननाशी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.
उंब्रज : चरेगाव, ता.कराड हद्दीदरम्यान असलेल्या सुकाई देवी मंदिरा जवळील परिसरात अवैधरित्या करण्यात आलेल्या मुरूम उत्खननाशी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, चरेगाव आणि कळंत्रेवाडी गावच्या हद्दीच्या दरम्यान असलेल्या काही सूकाईदेवी मंदिराशेजारील मोकळ्या जागेत गेल्या आठवड्यात काही अज्ञात मुरूम चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करून नैसर्गिक साधन संपत्तीची हानी केली आहे. तरी आपण यामध्ये लक्ष घालून त्या व्यक्ती कोण आहे त्याचा तपास करून मुरूम उत्खननात वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्री आणि मालक यांवर योग्य ती कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे, दक्षिण कराड तालुका अध्यक्ष दादासो शिंगण, कराड उत्तर तालुका अध्यक्ष रणजीत कदम, जिल्हा सचिव चंद्रकांत पवार, उंब्रज शहराध्यक्ष विजय वाणी, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अतुल देसाई हे उपस्थित होते.