maharashtra

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड येथील दोघांवर गुन्हा


हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड येथील दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड येथील दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी हद्दपारीचे आदेश बजावलेले असतानाही श्रीधर उर्फ भैय्या काशिनाथ थोरवडे वय 20, आणि बजरंग सुरेश माने वय 27, रा. बुधवार पेठ, कराड हे दोघे आदेशाचे उल्लंघन करून अश्विनी बियर बारजवळ, कराड, येथे 28 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आढळून आले. याबाबतची फिर्याद जयसिंग तुकाराम राजगे, वय 46 यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.