तासवडे टोल नाका, ता. कराड परिसरात जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : तासवडे टोल नाका, ता. कराड परिसरात जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 जुलै रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावरील तासवडे टोल नाका, ता. कराड परिसरात असणार्या शौचालयाजवळ भरत शंकर सावंत, वय 38 यांच्याशी बोलत बोलत दोन तृतीयपंथीयांनी सावंत यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची गोफ टाईप असणारी सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला आहे. या गुन्ह्याची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे.


