maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास चरेगाव, ता. कराड गावच्या हद्दीत उंब्रज ते पाटण जाणार्‍या रोडवर सागर मधुकर ढेरे. रा. कापसार, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी याने त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कार क्रमांक एम. एच. 08 आर 66 62 ही भरधाव वेगाने, रस्त्याची परिस्थिती न पाहता चालवून समोरून येणार्‍या दुचाकीस क्रमांक एम. एच. 12 केजी 8134 हिला रॉंग साईडने जाऊन धडक देऊन अपघात केला. या अपघातामध्ये दुचाकी चालक उम्मीद अलम इलाहीबक्ष शेख, रा. गिरिविहार सोसायटी, विलासपुर, सातारा हे गंभीर जखमी झाले. सागर मधुकर ढेरे याच्यावर युवराज काशिनाथ पवार वय 39 यांनी याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.