सुमंगलनगर, कार्वे नाका, कराड येथे वीज बिलांची थकीत वसुली करण्यासाठी गेलेल्या वायरमनला मारहाण करण्यात आली. गुरुवारी 24 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड : सुमंगलनगर, कार्वे नाका, कराड येथे वीज बिलांची थकीत वसुली करण्यासाठी गेलेल्या वायरमनला मारहाण करण्यात आली. गुरुवारी 24 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक परमार (पूर्ण नाव माहीत नाही. रा. सुमंगलनगर, कार्वे नाका, कराड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर संभाजी ज्ञानदेव जाधव (वय 37) असे मारहाण झालेल्या वायरमनचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महावितरणच्या थकित वीज बिलांची वसुली करण्यासाठी संभाजी जाधव हे सुमंगलनगर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी विनायक परमार यांना थकीत वीज बिल भरण्यास सांगितले. त्यानंतर परमार यांने ये वायरमन तू मला अरे तुरे का बोलतोस? मी बिल भरत नाही, तुला काय करायचे आहे ते कर? असे म्हणून वायरमन संभाजी जाधव यांच्याबरोबर वाद घालत त्यांना शिवीगाळ केली.
यावेळी वायरमन जाधव यांनी मी सरकारी कर्मचारी आहे. मला शिव्या देऊ नका. तुम्ही वीज बिलाची थकीत रक्कम भरा, असे सांगितले. मात्र, परमार यांने संजय जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विनायक परमार याच्यावर संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करत आहेत.


