maharashtra

कराडचा नवीन कृष्णा पूल वाहतुकीस खुला...!!


Karad's new Krishna bridge open to traffic ... !!
कराड ते विटा महामार्गावरील येथील कृष्णा नदीवर झालेला नवीन कृष्णा पूल दुपारपासून वाहतुकीला खुला करण्यात आला. पुलाचे काम तब्बल तीन वर्षे सुरू असल्याने पूल बहुचर्चित होता. त्यासाठी तब्बल ३५ कोटींचा खर्च आला आहे. पूल तब्बल ३२० मीटरचा आहे. पुलाखाली ४० मीटरचे आठ गाळे आहेत.

कराड : कराड ते विटा महामार्गावरील येथील कृष्णा नदीवर झालेला नवीन कृष्णा पूल दुपारपासून वाहतुकीला खुला करण्यात आला. पुलाचे काम तब्बल तीन वर्षे सुरू असल्याने पूल बहुचर्चित होता. त्यासाठी तब्बल ३५ कोटींचा खर्च आला आहे. पूल तब्बल ३२० मीटरचा आहे. पुलाखाली ४० मीटरचे आठ गाळे आहेत. पुलाचे पिलर्स नदीच्या पात्रात तब्बल २० फूट खोल बांधकाम करून उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्याची उभारणी केली आहे.
येथील कृष्णा पूल आज दुपारपासून वाहतुकीस खुला केला आहे. काल रात्री उशिरापर्यंत पुलाचे काम सुरू होते. हा पूल कराड ते विटा रस्त्यावर असून त्याला गुहागर ते पंढरपूर महामार्ग असेही संबोधले जाते. त्या नवीन पुलाचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले. त्यावेळी जुना कृष्णा पूल अस्‍तित्वात होता. मात्र, महापुरात तो पडला. त्यामुळे तेथील वाहतूक शेजारीच उभारलेल्या यापूर्वीच्या नव्या पुलावरून सुरू होती. येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांचा वाहतुकीचा ताण त्या पुलावर होता. त्यामुळे नवीन कृष्णा पूल लवकरच खुला करावा, अशी मागणी जोर धरत होती.
या पुलाचे काम होताच दुपारपासून नवीन कृष्णा पूल वाहतुकीला खुला करण्यात आला. रस्ता रुंदीकरण कामात नवीन कृष्णा पूल बांधला आहे. कोरोना, पुराच्या काळात पुलाचे काम रखडण्याची भीती होती. मात्र, मागील वर्षापासून पुलाच्या कामाला गती आली. ते काही कालावधीतच पूर्ण झाले. पुलाच्या जोडरस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे नवीन कृष्णा पुलावरून वाहतूक खुली केली. पुलाच्या जोडरस्त्यावर दोन्ही बाजूला संरक्षक लोखंडी ग्रील बसवण्यात येत आहे. त्याचे काम सुरू आहे. पुलावर लाईट व्यवस्था केली जाणार आहे. यापूर्वी दोनच दिवसांपूर्वी कोयना नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता नवीन कृष्णा पूल वाहतुकीला खुला झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर व कृष्णा नाक्यासह कृष्णा कॅनॉलवर वाहतुकीची कोंडी कमी होण्यास हातभार लागणार आहे.