maharashtra

कालेत एकास मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा


A case has been registered against two persons for assaulting a man in Kale
काले, ता. कराड येथे माझ्या शेतात टाकलेले घेवड्याचे वेल काढ, असे म्हटल्याच्या कारणावरुन पिता-पुत्राने एकाला मारहाण केली. गुरूवारी १७ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कराड : काले, ता. कराड येथे माझ्या शेतात टाकलेले घेवड्याचे वेल काढ, असे म्हटल्याच्या कारणावरुन पिता-पुत्राने एकाला मारहाण केली. गुरूवारी १७ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुमंत बळवंत लाडी रा. काले यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. तर प्रकाश नामदेव लाडी व सागर प्रकाश लाडी रा. काले या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काले येथील सुमंत लाडी यांचे दक्षिण मांड नदीकाठावर शेत असून शेतानजीकच त्यांची वस्ती आहे. त्यांच्या या शेताजवळ चुलते प्रकाश लाडी यांची शेतजमिन आहे. गुरूवारी सायंकाळी सुमंत हे वस्तीवर गेले होते. यावेळी त्यांच्या शेतात प्रकाश लाडी यांनी घेवड्याचे वेल टाकल्याचे त्यांना दिसून आले. सुमंत यांनी त्यांना ते वेल हटविण्यास सांगीतले. त्यावर प्रकाश लाडी याने शिविगाळ केली. तसेच त्याचा मुलगा सागर याने लाकडी दांडक्याने सुमंत यांना मारहाण केली. याबाबत सुमंत लाडी यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांवर फिर्याद दिली असून त्यावरुन दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.