maharashtra
शकिला शेख ठरली कराड तालुक्यातील पहिली महिला सैनिक
कोळे येथे जल्लोषाच्या वातावरणात जंगी मिरवणूक
खरं तर असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. विशेषतः सैन्यदलात महिला सहभागी होण्याचे प्रमाण अल्प आहे. कोळे, ता. कराड येथील भूमीकन्या शकिला आमीर शेख हिने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स दलात रूज होत सैन्य दलातील कराड तालुक्याची पहिली कन्या होण्याचा मान मिळवला आहे.
कराड : खरं तर असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. विशेषतः सैन्यदलात महिला सहभागी होण्याचे प्रमाण अल्प आहे. कोळे, ता. कराड येथील भूमीकन्या शकिला आमीर शेख हिने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स दलात रूज होत सैन्य दलातील कराड तालुक्याची पहिली कन्या होण्याचा मान मिळवला आहे.
कोळे ता. कराड येथील ग्रामस्थांनी शकिला शेख हिच्या निवडीनंतर गावातून जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढली आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशातील लेकींनी सैन्यदलात बिनधास्त सामील व्हा. देशसेवा ही काळाची गरज आहे. करियर करण्यासाठी सैन्यदलात खूप संधी आहेत. अनेक महिलासैनिकांचा आदर्श घेवून ही भरारी घ्यावी, असे मतही शकिला शेख हिने व्यक्त केले आहे.


