maharashtra

महिला वसतिगृह गृहपालास 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

पेन्शन मिळवून देण्यासाठी मागितली होती 20 हजारांची लाच

The woman hostel rector was caught red-handed while accepting a bribe of Rs 15,000
सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन मिळवून देण्यासाठी बी.सि. ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, उत्तर पार्ले ता. कराड येथील गृहपाल वर्ग 3 महिला अधिकारी यांनी तक्रारदार महिलेकडे 20 हजारांची लाच मगितली. त्यानंतर गुरुवार सापळा रचून 15 हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने संबंधित महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. गुरुवारी 17 रोजी ही कारवाई करण्यात आली.

कराड : सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन मिळवून देण्यासाठी बी.सि. ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, उत्तर पार्ले ता. कराड येथील गृहपाल वर्ग 3 महिला अधिकारी यांनी तक्रारदार महिलेकडे 20 हजारांची लाच मगितली. त्यानंतर गुरुवार सापळा रचून 15 हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने संबंधित महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. गुरुवारी 17 रोजी ही कारवाई करण्यात आली.
त्नमाला रामदास जाधव (वय 52) पद - गृहपाल, बी.सि. ई. बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, उत्तर पार्ले ता. कराड वर्ग - 3 (मुळ रा. शाहूनगर, बीड ता.जि. बीड, सध्या रा. शासकीय वसतिगृह, कराड असे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सासूबाईच्या निधनानंतर त्यांचे पती व तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन मिळवून देण्यासाठी बी.सि. ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, उत्तर पार्ले ता. कराड येथील गृहपाल वर्ग 3 अधिकारी यांनी तक्रारदार महिलेकडे 20 हजारांची लाच मगितली.
त्यानंतर याप्रकरणी तक्रारदार महिलेने याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करून दाद मागितली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी 17 रोजी सापळा रचून बी.सि.ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, उत्तर पार्ले ता. कराड येथील वर्ग 3 अधिकारी आरोपी रत्नमाला रामदास जाधव (पद- गृहपाल) यांना 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पडकले.
याप्रकरणी राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे परिक्षेत्र, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे, सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र. वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सातारा पोलीस अंमलदार संभाजी काटकर, तुषार भोसले, माहिला पोलीस अंमलदार श्रद्धा माने, शितल सपकाळ सर्व ने.लाप्रवि, सातारा यांनी सापळा रचून ही कारवाई केली.