maharashtra

कराडात ऑल आऊट मोहिमेत 15 जणांवर कारवाई


Action against 15 people in Karad All Out campaign
कराड शहर पोलिस ठाण्याच्या माध्यमातुन शुक्रवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑल आऊट मोहिमेत एकुण 15 जणांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.  

कराड : कराड शहर पोलिस ठाण्याच्या माध्यमातुन शुक्रवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑल आऊट मोहिमेत एकुण 15 जणांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.  
शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक ऑल आऊट मोहिम सुरू केली. यामध्ये शहरात संशयास्पदरित्या फिरणारे सहाजण व वॉरंट असणाऱया सहा जणांवर कारवाई करण्यात आली. तर विविध गुन्हयात पाहिजे असलेल्या तिन संशयीत आरोपींना अटक करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतल रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीसीटर, हद्दपार इसम, कोल्हापुर नाका व दांगटवस्ती येथील पारधी वस्तीची तपासणी करण्यात आली. शहर पोलिसांनी अचानक राबवलेल्या या ऑलआऊट मोहिमेमुळे रात्री अपरात्री बाहेर फिरणाऱयांची धांदल उडाली.