maharashtra

विनापरवाना खैर लाकडाची वाहतुक करणारा ट्रक ताब्यात

वनविभागाची धडक कारवाई : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Unlicensed Khair timber truck seized
वराडे, ता. कराड गावानजीक पुणे-बेंगलोर आशिया महामार्गावर विनापरवाना खैर प्रजातीची वृक्षतोड करून त्यापासून माल तयार केलेल्या मालाची वाहतुक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी   वनविभागाकडून ही कारवाई मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये ट्रकसह ट्रक चालकास वनविभागाने ताब्यात घेतले. तसेच वनविभागाने साडे चार लाखांचा  मुद्देमालही जप्त केला आहे.

कराड : वराडे, ता. कराड गावानजीक पुणे-बेंगलोर आशिया महामार्गावर विनापरवाना खैर प्रजातीची वृक्षतोड करून त्यापासून माल तयार केलेल्या मालाची वाहतुक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी   वनविभागाकडून ही कारवाई मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये ट्रकसह ट्रक चालकास वनविभागाने ताब्यात घेतले. तसेच वनविभागाने साडे चार लाखांचा  मुद्देमालही जप्त केला आहे.
भोलानाथ धरमराज यादव (वय 44) रा. आझादनगर, डोंगरकलिया शिवमंदिर डुंगरा वाकी ता. पारडी, जि. वल्साद, गुजरात असे ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
याबाबत वनविभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर गस्त करत असताना त्यांना एका ट्रकचा संशय आला. त्यानुसार त्यांनी त्या ट्रकला थांबवून त्याची पाहणी केली. ट्रकमध्ये विनापरवाना खैर प्रजातीचा सोलीव मालाची वाहतुक केली ज असल्याचे आढळून आले. याप्रकरणी वनविभागाने ट्रकचालकास 4 लाख 67 हजाराच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुणे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल रमेश कुंभार, वनकर्मचारी ए. एन. जाधव, डी.एच. अवघडे, शि.ज. पाटील, शंभूराज माने, श्रीकांत चव्हाण यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते करीत आहेत.