रहिमतपुर, ता. कोरेगाव येथून अज्ञात चोरट्याने मोटरची चोरी केल्याची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जणी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ऊस तोडणीसाठी आठ जोड्या कामगार देतो, असे सांगून नाडे, ता. पाटण येथील एकाची ९ लाख ५० हजार रुपयांची सुरू केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शेंदुरजने (ता वाई) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत उपसरपंच व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले .याबाबत रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
जिल्हा नियोजन समितीचा निधी मार्चअखेर खर्च करावयचा असतानाही अद्याप बहुतांश कामांची टेंडर प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे निधी अखर्चित राहण्याची स्थिती आली आहे. काही निधी जिल्हा परिषदेकडे वळवण्याची वेळ आली आहे.
माणसाच्या जगण्यातल्या दैनंदिन समस्या केवळ ग्रंथ व्यासंगाच्या जोरावर सोडवल्या जाऊ शकतात, असे कळकळीचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.
कोरेगाव, ता. कोरेगाव येथून कीटकनाशक औषधांच्या पिशव्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी दोन जणांना अटक करत त्यांच्याकडून २ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तीन वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित दऱ्या खटपट्या भोसले, रा.मालगाव, ता. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने जांब, ता. वाई येथून अटक केली.
माण तालुक्यातील बंधार्यावरील लोखंडी प्लेटा चोरणाच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. विशेष म्हणजे मोक्काच्या गुन्ह्यातून सुटलेल्या आरोपीचा या चोरीत सहभाग आहे. त्यांच्याकडून पीकअप वाहन व प्लेटा असा 9 लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पत्रकार गुरुनाथ जाधव यांच्या मातोश्री सौ. शालन पांडुरंग जाधव (वय 75) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.