maharashtra

बॉम्बे रेस्टाँरंट चौकात दोन चारचाकी गाडय़ा व एका दुचाकीचा अपघात


शहरातील बॉम्बे रेस्टाँरंट चौकात दोन चारचाकी गाडय़ा व एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात आटपाडी गावचे पवार कुटुंबिय जखमी झाले आहे. तर दुचाकीस्वार यांची कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

सातारा : शहरातील बॉम्बे रेस्टाँरंट चौकात दोन चारचाकी गाडय़ा व एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात आटपाडी गावचे पवार कुटुंबिय जखमी झाले आहे. तर दुचाकीस्वार यांची कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. याबाबत अद्याप शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याने पोलीस हवालदार कराळे यांनी सांगितले.  
शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौकात कोल्हापूरच्या दिशेने येणाऱया चारचाकी गाडीने पुढे असलेल्या चारचाकी व दुचाकी गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत आटपाडी गावचे अमोल सावंत व त्यांची पत्नी मुलगी जखमी झाले. त्यांनी गाडीतून बाहेर काढून नागरिकांनी तात्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ते किरकोळ जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु दुचाकीस्वाराबद्दल पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी त्यांची दुचाकी ताब्यात घेतली आहे. अद्याप कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.