सातारा शहरातील नगरपालिकेच्या तीन पडझड झालेल्या शाळांची पालिका अधिकारी व पालकांनी आज पाहणी करून चर्चा केली.
सातारा : सातारा शहरातील नगरपालिकेच्या तीन पडझड झालेल्या शाळांची पालिका अधिकारी व पालकांनी आज पाहणी करून चर्चा केली.
सातारा येथील गुरुवार परज परिसरात नगरपालिकेच्या मालकीच्या शाळा क्रमांक ११, १३ आणि १४ अशा तीन शाळा असून त्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी केल्यानंतर संबंधित पालिकेचे अधिकारी व पालकांनी शाळा इमारतींची दुरुस्ती करायची का इमारती नव्याने बांधायच्या या संदर्भात चर्चा केली. शाळा इमारतींची दुरुस्ती करायची असल्यास त्याला दोन महिन्याचा तर इमारत नवीन बांधायचे असल्यास त्याला एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना कोठे बसवायचे असा प्रश्न असून संबंधित इमारतींची तज्ञांकडून पाहणी करून शाळा इमारतींची दुरुस्ती करायची का इमारती नवीन बांधायच्या याबाबत निर्णय घेण्याचे एकमत झाले.


