maharashtra

ग्रा.पं. निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावा


ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब दि. १९ जानेवारीपर्यंत सादर करावा, तो न केल्यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अर्चना वाघमळे यांनी दिली.

सातारा : ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब दि. १९ जानेवारीपर्यंत सादर करावा, तो न केल्यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अर्चना वाघमळे यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली व जे उमेदवार बिनविरोध निवडून आले अशांसाठी निवडणूक खर्चाचा हिशोब ३० दिवसांमध्ये सादर करणे बंधनकारक आहे. संबंधितांनी विहित नमुना आणि प्रतिज्ञा पत्राद्वारे संबंधित तहसीलदारांकडे निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक आहे. दि. १९ जानेवारीपर्यंत हा खर्च सादर करण्याबाबत ग्रामपंचायत विभागाने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे. दरम्यान विहित वेळेत खर्च सागर न करणारे उमेदवार कारवाईस पात्र ठरतील. जिल्हाधिकारी यांना अ पत्र ठरवतील. अपात्र ठरलेल्या उमेदवाराला पुढील पाच वर्ष निवडणूक लढवता येणार नसल्याने संबंधितांनी तात्काळ निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावा असे आवाहन अर्चना वाघमळे यांनी केले.