खेड मंडलाधिकार्यांच्या मनमानी कारभाराला जिल्हा प्रशासनाने चाप लावण्याची गरज निर्माण झाली असून या भ्रष्ट अधिकार्याला पदमुक्त करुन तेथे एखाद्या प्रामाणिक अधिकार्याची नेमणूक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
उरमोडी जलाशयाची उभारणी करताना पुनर्वसनातून मिळालेल्या जमिनीच्या रेकॉर्डवर माझ्या नावाची नोंद होत नाही. उलट ती जमीन शासनाने तारळी प्रकल्पासाठी दुबार संपादित केल्याने झालेल्या अन्यायाच्या विरोधात मी माझ्या कुटुंबासह दि.२६ जानेवारी रोजी उरमोडी जलाशयात कुटुंबीयांसह जलसमर्पण करणार असल्याचा इशारा आष्टे, ता. सातारा येथील श्रीरंग ढगे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना एका निवेदनाद्वारे दिला.
सातारा शहरातील नगरपालिकेच्या तीन पडझड झालेल्या शाळांची पालिका अधिकारी व पालकांनी आज पाहणी करून चर्चा केली.
शाहूपुरीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, व्हॉल्व लिकेजचे कारण सातत्याने पुढे करत अनियमित, अपुरा, विस्कळीत पाणीपुवठा केला जातो.
ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब दि. १९ जानेवारीपर्यंत सादर करावा, तो न केल्यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अर्चना वाघमळे यांनी दिली.
येथील जिल्हा परिषद मैदानावर शंकर सारडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथ महोत्सवात महाराष्ट्रातील मान्यवर प्रकाशकांनी आपले पुस्तकांचे स्टॉल लावले आहेत.
यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी आणि साताऱ्याचे पर्यटन, रोजगार वाढवावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली,
महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक घाटातील तीव्र उतारावर मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला आहे. या घटनेत 40 मजूर टेम्पोतून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शहरातील बॉम्बे रेस्टाँरंट चौकात दोन चारचाकी गाडय़ा व एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात आटपाडी गावचे पवार कुटुंबिय जखमी झाले आहे. तर दुचाकीस्वार यांची कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.
काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.