maharashtra

धनगरवाडी येथे मारहाणीच्या परस्परविरोधी तक्रारी


धनगरवाडी, कोडोली, ता. सातारा येथे मारहाणीच्या परस्पर विरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता घडली.

सातारा : धनगरवाडी, कोडोली, ता. सातारा येथे मारहाणीच्या परस्पर विरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता घडली.
श्रीमंत एकनाथ शेंडगे (वय ४७, रा. धनगरवाडी) यांनी फिर्याद दिली असून, त्यात नमूद केले आहे की, संशयित आरोपींच्या घरात भांडणे सुरु असल्याने भांडणे करु नका, असे सांगण्यास गेलेल्या एकाला मारहाण केली. याप्रकरणी साहेबराव विठोबा माने, हणमंत साहेबराव माने (दोघेही रा. धनगरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. साहेबराव माने यांच्या घरात भांडण सुरु असल्याने भांडण न करण्याबाबत समजून सांगण्यात गेल्याने साहेबराव माने, हणमंत माने या दोघांनी फिर्यादीला मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक भिसे करत आहेत.
हणमंत साहेबराव माने (वय १९, रा. धनगरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, वडीलांचे व भावाचे बाजार आणण्यासाठी पैसे देण्याघेण्यावरुन वाद सुरु होता. त्यावेळी संशयित आरोपी श्रीमंत शेडगे यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. याचा तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.