maharashtra

दगडाने फोडली टोयोटा कार


टोयोटा कार पार्किंगमधून बाहेर घेत असताना दुचाकीस्वाराला त्याचा धक्का लागून तो पडला. यावर चिडून दुचाकीस्वाराने टोयोटा कार दगडाने फोडली.

सातारा : टोयोटा कार पार्किंगमधून बाहेर घेत असताना दुचाकीस्वाराला त्याचा धक्का लागून तो पडला. यावर चिडून दुचाकीस्वाराने टोयोटा कार दगडाने फोडली. ही घटना खिंडवाडी, ता. सातारा येथे दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता घडली.
फिर्यादी उदय हरि घाडगे (वय ४३, रा. खिंडवाडी) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गोरख बजरंग गोडसे, सलोचना (पूर्ण नाव माहिती नाही, रा. खिंडवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत नमूद केले आहे की, फिर्यादी स्वत:च्या पार्किंगमधून टोयोटा कार रिव्हर्स घेत होते. यावेळी रस्त्यावरील दुचाकीला धक्का लागून दुचाकीस्वार पडला. यामुळे चिडलेल्या संशयित आरोपीने टोयोटा कार दगडाने फोडून कारचे नुकसान केले. तसेच संशयित आरोपी व बहिणीने मारहाण करुन फिर्यादीला जखमी केले.  या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक राजेंद्र भोंडवे करत आहेत.