maharashtra

जावयाने घातला सासऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड


माझ्या मुलीला त्रास देवू नको, तिला नीट सांभाळ, असे सांगत असल्याचा राग मनात धरुन जावयाने सासऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून मारहाण केली.

सातारा : माझ्या मुलीला त्रास देवू नको, तिला नीट सांभाळ, असे सांगत असल्याचा राग मनात धरुन जावयाने सासऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून मारहाण केली. ही घटना दरे खुर्द, ता. सातारा येथील जानकर कॉलनीत दि. १३ रोजी रात्री ८ वाजता घडली.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात धोंडीराम पुनाजी कोकरे (वय ६७, रा. जानकर कॉलनी) यांनी सतीश गणपत खरात, गणपत खरात (रा. भैरोबा पायथा, शाहूपुरी, सातारा), शोभा अंकुश कोकरे, अंकुश बाळू कोकरे (दोघे रा. जानकर कॉलनी, सातारा)यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार एस. एम. पवार हे तपास करत आहेत.