सातारा जिल्ह्यात सुमारे 21 गडकिल्ले आहेत. तर काही किल्ले टेहळणी बुरुज म्हणून प्रसिद्ध आहेत. या गडकिल्यावर गडसंवर्धन संस्था काम करत असतात. प्रथमच सातारा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून आपले गडकिल्ले, आपली जबाबदारी ही मोहिम राबवण्यास मकर संक्रातीच्या सुदिनी किल्ले अजिंक्यताऱ्यावरुन प्रारंभ करण्यात आला.
सातारा : सातारा जिल्ह्यात सुमारे 21 गडकिल्ले आहेत. तर काही किल्ले टेहळणी बुरुज म्हणून प्रसिद्ध आहेत. या गडकिल्यावर गडसंवर्धन संस्था काम करत असतात. प्रथमच सातारा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून आपले गडकिल्ले, आपली जबाबदारी ही मोहिम राबवण्यास मकर संक्रातीच्या सुदिनी किल्ले अजिंक्यताऱ्यावरुन प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत साताऱ्यातील सामाजिक संघटनांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दरम्यान, दोन तासामध्ये गडावरील राजसदर, राजवाडा, घाणा व परिसराची स्वच्छता करण्यात आली. गोळा करण्यात आलेला कचरा हा पोलिसांनी गडावरुन खाली आणला.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी साताऱ्यात कोरोना काळात उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यावेळी त्यांची छाप ही ऍक्शनबाज, डेरर अशी सातारा विभागासह जिल्ह्यात होती. गुन्हेगारांचा कर्दन काळ डिटेक्शनमध्ये स्वतः लक्ष घालून सुतावरुन स्वर्ग गाठून खऱ्या गुन्हेगारांपर्यत पोहचण्याचे काम त्यांनी केले होते. अनेक ठिकाणी काळय़ा धंद्यावर त्यांनी छापे त्यावेळी मारले होते. आता तर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार पहात आहेत. त्यांच्याकडून नवनवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. मकर संक्रातीच्या दिवशी सकाळी नियोजन केल्याप्रमाणे सातारा पोलीस दलाचे सुमारे अडीचशे कर्मचारी खालच्या मंगळाई मंदिराच्या जवळ जमले. तेथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या. सहभागी झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यास हातमोजे व लागणारे साहित्य दिले. गडाच्या प्रवेशद्वारापासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. गडाचा मुख्य दरवाजा, टेहळणी बुरुज, दगडी घाणा, राजसदर आणि मुख्य महल परिसराची स्वच्छता करण्यात आली. वाढलेले गवत काढण्यात आले. झाडांना आळे करण्यात आले. प्लास्टिकचे कागद गोळा करण्यात आले. गोळा करण्यात आलेला कचरा गडावरुन खाली आणण्यात आला. त्याचे योग्य पद्धतीने पालिकेच्या कचरा डेपोत निर्मूलन करण्यात आले. दरम्यान मोहिमेच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये मंगळाई मंदिर परिसरात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांना इतिहास तज्ञाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले.