दरे खुर्द, ता. सातारा येथे एकाला मारहाण झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : दरे खुर्द, ता. सातारा येथे एकाला मारहाण झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ जानेवारी रोजी ८ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास दरे खुर्द येथील जानकर कॉलनीमध्ये राहणाऱ्या धोंडीबा पुनाजी कोकरे, वय ६७ यांच्या राहत्या घरात घुसून त्यांची पत्नी व मुलीला सतीश गणपत खरात, गणपत खरात, दोघेही रा. शाहूपुरी, सातारा आणि शोभा अंकुश कोकरे, अंकुश बाळु कोकरे, दोघेही रा. जानकर कॉलनी यांनी धोंडीबा कोकरे यांना मारहाण केली. याबाबत धोंडीबा कोकरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


