कोडोली, ता. सातारा येथील एक १५ वर्षीय शालेय मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सातारा : कोडोली, ता. सातारा येथील एक १५ वर्षीय शालेय मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता शाळेसमोर कोणीतरी अज्ञाताने तिला पळवून नेले आहे.
तसेच खेड, ता. सातारा येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची घटना दि. १३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक फौजदार एस. आर. दिघे करत आहेत.