एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश विजय बुधावले वय 21 रा. कोरेगाव, ता. कोरेगाव हा गेल्या चार ते पाच वर्षापासून बोलत नसल्याचा राग मनात धरून अक्षय अनिल सरगडे रा. आंबेडकर नगर, कोरेगाव, ता. कोरेगाव याने लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक उदागे अधिक तपास करीत आहेत.