शहरातील जुना मोटार स्टँड परिसरात सुरु असलेल्या तीन जुगार अड्डयांवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. यात ८ जणांना ताब्यात घेतले.
सातारा : शहरातील जुना मोटार स्टँड परिसरात सुरु असलेल्या तीन जुगार अड्डयांवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. यात ८ जणांना ताब्यात घेतले.
जुना मोटार स्टँड येथील सुमित्राराजे व्यापारी संकुलाच्या तळमजल्यातील मोकळ्या जागेत जुगार अड्डयावर कारवाई केली. यात सुनील मल्हारी शेलार (वय ३७, रा. शनिवार पेठ, सातारा), संदीप सर्जेराव शिंदे (वय ३०, रा. करंजे, सातारा), धनंजय चंद्रमणी आगाणे (रा. गणेश चौक, गोडोली, सातारा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७५० रुपये रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच जुना मोटार स्टँड येथील भाजी मंडईच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला जुगार अड्डयावर कारवाई केली. यामध्ये अमोल आनंद वासुदेव (वय ३८, मंगळवार पेठ, सातारा), जगदीश रामेश्वर मते (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५९२ रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
जुना मोटार स्टँडजवळील परवेज चिकन गोडावूनसमोर हिरव्या रंगाच्या टपरीत सुरु असलेल्या जुगारावरही पोलिसांनी कारवाई केली. यात विनोद रमेश मोहिते (वय ४३, सोमवार पेठ, सातारा), निलेश भीमराव वाघमळे (वय ३५, रा. कण्हेर, ता. सातारा), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून ९ हजार २०२ रुपये व जुगाराचे साहित्य, मोबाईल जप्त केले.


